ETV Bharat / business

आर्थिक पॅकेज: खनिज उत्खननाला प्रोत्साहन; ५०० खाणींचा करण्यात येणार लिलाव

ब्रॉक्साईट आणि कोळशांचे साठ्यांचे लिलाव संयुक्तपणे घेण्यात येणार आहे. त्यामुळे अ‌ॅल्युमिनिअम उद्योगातील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन
author img

By

Published : May 16, 2020, 5:55 PM IST

Updated : May 16, 2020, 7:23 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खनिजांच्या उत्खननासाठी प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. ५०० खनिजांच्या साठ्यांचे उत्खनन करण्यासाठी लिलाव घेण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. या निर्णयाने केंद्र सरकारची खनिज क्षेत्रातील वर्चस्व संपुष्टात येणार आहे.

ब्रॉक्साईट आणि कोळशांच्या साठ्यांचे संयुक्तपणे लिलाव घेण्यात येणार आहे. त्यामुळे अ‌ॅल्युमिनिअम उद्योगातील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा-चीनमधून जर्मनीची 'ही' कंपनी भारतात हलविणार उत्पादन प्रकल्प

वीजनिर्मितीचा खर्च करण्यासाठी अ‌ॅल्युमिनिअमच्या उद्योगाला मदत होणार आहे. बंद आणि चालू असलेल्या खाणींमधील फरक काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे खाणी भाड्याने देणे आणि अतिरिक्त खनिजाची विक्री करणे शक्य होणार आहे. त्यामधून उत्पादन कार्यक्षमतेने शक्य होईल, असे सीतारामन यांनी सांगितले. खाणींवरील मुद्रांक शुल्क एकसमान करण्यात येणार असल्याचेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा-आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी

Last Updated : May 16, 2020, 7:23 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.