नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला फटका बसला असला तरी थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे. ही गुंतवणूक मागील वर्षात १३ टक्क्यांनी वाढून ५७ अब्ज डॉलर झाली आहे.
देशातील गुंतवणुकीबाबत युएनसीटीएडीने अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार डिजीटल अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढल्याने थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे. फेसबुकच्या मालकी असलेल्या जाडूने जिओमध्ये १० टक्क्यांची ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कोरोनाच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीला सामोरे गेली आहे. अशा काळात गुंतवणुकदारांनी विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे. जागतिक एकूण थेट विदेशी गुंतवणुकीत भारत आणि चीनकडून ७२ टक्के गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-अॅप बंदी: भारताकडून नियमांचा भंग केल्याची चीनकडून कागाळी
चीनमध्ये गुंतवणुकीत वाढ-
चीनमध्ये ४ टक्क्यांनी थेट विदेश गुंतवणूक वाढून १६३ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे चीनच्या विकासदरात वाढ झाली आहे. तर मागील आर्थिक वर्षात जागतिक थेट विदेशी गुंतवणुकीत ४२ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०१९ मध्ये जागतिक थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण १.५ लाख कोटी डॉलर तर २०२० मध्ये ८५९ अब्ज डॉलर राहिले आहे. तर युकेमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण हे जवळपास शून्य टक्के झाले आहे. युएनसीटीएडीच्या गुंतवणूक विभागाचे संचालक जेम्स झान म्हणाले की, विदेशातील नवीन उत्पादक मालमत्तेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदार सावधानतेचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-'जीएसटी'तील किचकट तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा शुक्रवारी देशव्यापी एल्गार