नवी दिल्ली - कोरोना महामारीत अर्थव्यवस्थेला फटका बसला असताना दिलासादायक बातमी आहे. मे महिन्यात भारताच्या निर्यातीत ६९.३५ टक्के वाढ होऊन ३२.२७ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने व रत्ने आणि दागिने यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. तर व्यापारी तुटीत ६.२८ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.
गतवर्षी मे महिन्यात १९ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. तर मे २०१९ मध्ये २९.८५ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. निर्यातीबरोबर मे २०२१ मध्ये आयातीत वाढ झाली आहे.
हेही वाचा-गलवानच्या खोऱ्यातील संघर्षानंतर ४३ टक्के भारतीयांची 'चायनामेड'कडे पाठ-सर्वेक्षण
असे राहिले आयात-निर्यातीचे प्रमाण
- मे २०२१ मध्ये आयात ७३.६४ टक्क्यांनी वाढून ३८.५५ अब्ज डॉलर झाली आहे. गतवर्षी मे महिन्यात २२२ मे २०२९ मध्ये ४६.६८ अब्ज डॉलरची आयात झाली होती.
- एप्रिल ते मे महिन्यात निर्यात वाढून ६२.८९ अब्ज डॉलर झाली आहे. तर गतवर्षी एप्रिल ते मे महिन्यात निर्यात २९.४१ अब्ज डॉलर झाली होती.
- चालू वर्षात एप्रिल ते मे २०२१ मध्ये ८४.२७ अब्ज डॉलरची आयात झाली. गतवर्षी एप्रिल ते मे महिन्यात ३९.४२ अब्ज डॉलरची आयात झाली होती.
- चालू वर्षात एप्रिल ते मे महिन्यात व्यापारी तुटीचे प्रमाण हे २१.३८ अब्ज डॉलर राहिले आहे. तर मागील वर्षात एप्रिल ते महिन्यात व्यापारी तुटीचे प्रमाण हे ९.११ अब्ज डॉलर राहिले आहे.
- सोन्याच्या आयातीचे प्रमाण हे मे महिन्यात ६७९ दशलक्ष डॉलर राहिले आहे. तर गतवर्षी मे महिन्यात सोन्याची आयात ही ७६.३१ दशलक्ष डॉलर राहिले आहे.
हेही वाचा-टीव्हीएस मोटरकडून आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर ११,२५० रुपयांनी स्वस्त
असे राहिले निर्यातीचे प्रमाण-
अभियांत्रिकीची निर्यात ८.६४ अब्ज डॉलर, पेट्रोलियम उत्पादने ५.३३ अब्ज डॉलर व रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीचे प्रमाण हे २.९६ अब्ज डॉलर राहिले आहे.