नवी दिल्ली - लॉकडाऊन काळात एप्रिल महिन्यात 1.33 लाख रोजगार नोंदणी झाल्याची माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिली आहे. देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 25 मार्चला लॉकडाऊन घोषीत केले होते.
गेल्या महिन्यात ईपीएफओने जाहीर केलेल्या पगाराच्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की, या वर्षी मार्चमध्ये नवीन नोंदणी 5.72 लाखांवर गेली आहे. त्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये 10.21 लाख होती. प्रत्येक महिन्यात नवीन नोंदणी दरमहा सरासरी 7 लाखांच्या आसपास असते.
आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2017 ते एप्रिल 2020 या कालावधीत नवीन ग्राहकांची संख्या 1.56 कोटी होती. तर 2017 ते मार्च 2018 प्रर्यंत नवीन नोंदणी ही 15.52 लाख होती.
कर्मचार्यांच्या नोंदी अद्ययावत करणे ही एक सतत प्रक्रिया आहे. त्यानंतरच्या काही महिन्यांत ती अद्ययावत होत असल्याने वेतनश्रेणी अस्थायी असल्याचे ईपीएफओने म्हटले आहे. लॉकडाऊन लक्षात घेता एप्रिल 2020 ची ईसीआर सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे, असे म्हटले आहे.
ईपीएफओ भारतातील संघटित किंवा अर्ध-संघटित क्षेत्रातील कामगारांचे सामाजिक सुरक्षा निधी व्यवस्थापित करते आणि त्यात 6 कोटीहून अधिक सक्रिय सदस्य आहेत.