नवी दिल्ली - निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाने (सीबीआयसी) क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये पैसे, दारू आणि सोने यांच्या बैकायदेशीर व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना सीबीआयसीने बजावले आहे.
दक्षतेच्या दृष्टीने आणि कारवाई केलेली माहिती सरकारी संस्थांना अपडेट द्यावेत, असे सीबीआयसीनेआदेशात म्हटले आहे.
काय म्हटले आहे आदेशात-
बेकायदेशीर चलन शोधून काढणे आणि जप्त करण्याचे प्रयत्न करावेत, असे सीबीआयसीने म्हटले आहे. याशिवाय दारू, सोने, बनावट नोटा, एनडीपीएस ( नॅक्रॉटिक ड्रग्ज) यांचाही शोध घेण्याचे सीबीआयीसीने आदेशात म्हटले आहे. देशांतर्गत तसेच सीमेवरही वाहने, रेल्वे तसे खासगी आणि व्यावसायिक विमानांवर लक्ष ठेवण्याची गरज सीबीआयने व्यक्त केली आहे.
- काही बेकायदेशीर घडू नये, यासाठी पूर्वदक्षता मोहीम आखावी.
- संवदेशनशील क्षेत्रात मोबाईल स्क्वाड्स आणि विशेष पथके नेमण्यात यावीत.
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या नियोजनासाठी विविध विभागांची बैठक घेतली होती. या बैठकीत निवडणूक आयोगाने सर्व विभागात समन्वय ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर सीबीआयसीने दक्षतेची पावले उचलली आहेत.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम -
१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला ११ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. ही मतदान प्रक्रिया १९ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. तर मतदान मोजणी ही २३ मे रोजी पार पडणार आहे.