नवी दिल्ली- आठ पायाभूत क्षेत्रांचे उत्पादन जानेवारीत ०.१ टक्क्यांनी वाढले आहे. खते, स्टील आणि वीजनिर्मितीत सुधारणा झाल्याने पायाभूत क्षेत्रांचे उत्पादन वाढले आहे. ही माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
गतवर्षी जानेवारीत आठ पायाभूत क्षेत्रांचे उत्पादन हे २.२ टक्क्यांनी वाढले होते. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण उत्पादने आणि सिमेंटच्या उत्पादनात जानेवारीत घसरण झाली आहे. जानेवारीत खते २.७ टक्के, स्टीलचे उत्पादन २.६ टक्के आणि वीजनिर्मितीच्या उत्पादनात ५.१ टक्के घसरण झाली आहे.
हेही वाचा-ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपीत ०.४ टक्क्यांची वाढ
एप्रिल ते जानेवारी २०२०-२१ मध्ये पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनात ८.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर गतवर्षी एप्रिल ते जानेवारीत पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनात ०.८ टक्क्यांची वाढ झाली होती. आठ पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ४०.२७ टक्के हिस्सा आहे.
हेही वाचा-'वित्तीय क्षेत्रात विश्वासासह पारदर्शकता जपण्याला सर्वोच्च प्राधान्य'