वॉशिंग्टन - जागतिक अर्थव्यवस्थेत एकाचवेळी मंदावलेली अर्थव्यवस्था जाणवत आहे. याचा परिणाम म्हणून चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर गेल्या ९० वर्षात सर्वात कमी राहणार आहे. याचा परिणाम सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेत अधिक स्पष्ट जाणवणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी इशारा दिला.
जागतिक बँकेची पुढील आठवड्यात वार्षिक बैठक सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेल्या ख्रिस्टिलिना जॉर्जिया या आयएमफच्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेबात इशारा दिला. त्या म्हणाल्या, चालू वर्षाचा आणि पुढील वर्षाचा 'जागतिक आर्थिक दृष्टीक्षेप' अहवाल पुढील आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार आहे.
हेही वाचा-संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक संकटात; चालू महिनाअखेर तिजोरीत होणार खडखडाट
वेगाने वाढणाऱ्या सुमारे ४० देशांच्या अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्थांचे वास्तविक राष्ट्रीय सकल उत्पन्न (रियल जीडीपी) हे ५ टक्क्यांहून अधिक राहणार आहे. ब्राझील आणि भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर मंदीचा प्रभाव दिसून येणार आहे. अनेक वर्षानंतर चीनचा वृद्धीदर कमी झाला आहे. पतधोरण हे अधिक हुशारीने आणि वित्तीय स्थिरतेने राबवावे, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
हेही वाचा-सरकारची दिवाळी भेट : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
काही धोरणकर्त्यांना कमी व्याजदरामुळे अतिरिक्त पैसे खर्च करणे शक्य होणार आहे. योग्य सुधारणा आणि योग्य क्रमात केल्यास वेगाने विकसित होणाऱ्या बाजारपेठांचा वेग दुप्पट होवू शकतो. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या होणाऱ्या अर्थव्यवस्था या विकसित अर्थव्यवस्था होवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी 'या' महिला अर्थतज्ज्ञाची नियुक्ती
हवामान बदल हे संकट-
हवामान बदल हे संकट असून त्यापासून कोणी मुक्त राहू शकत नाही, असे ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी सांगितले. हवामान बदलावर कृती करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.