मुंबई - नेपाळ आणि बांगलादेशमधून खाद्यतेल आयात केले जात आहे. त्यामुळे सरकारचे मासिक ५० कोटींचे नुकसान होत आहे. तसेच देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा एसईए या उद्योग संघटनेने केला आहे.
सार्क देशापैकी ५ देशातून वस्तुंची आयात केली जाते. या आयातीवर संपूर्ण सीमा शुल्क माफ आहे. याचा फायदा घेत नेपाळ आणि बांगलादेशमधून पामतेल आणि सोयाबीन तेल आयात करण्यात येत आहे. प्रत्यक्षात नेपाळमध्ये पामतेलाचे उत्पादन होत नाही. तर सोयाबीन तेलाचे कमी उत्पादन होत असल्याचे सोलव्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशनचे (एसईए) अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले.
हेही वाचा-केंद्र सरकार बीएसएनएलसह एमटीएनएलला देणार ३० हजार कोटींचे पॅकेज
सीमा शुल्क माफ असलेल्या खाद्यतेलाची आयात करू नये, अशी एसईए या संघटनेने मागणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये खाद्यतेल आयातीत १३ टक्के घट झाली आहे. भारताने मलेशियामधून आयात होणाऱ्या खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविल्यामुळे ही घट झाली आहे.