ETV Bharat / business

अर्थव्यवस्था रिंगमास्टरचे ऐकणार नाही; चिदंबरम यांचा केंद्राला टोला - P Chidambaram slammed Modi gov over economy

पी. चिदंबरम म्हणाले, की जर सरकारने गरिबांच्या हातात पैसा आणि ताटात अन्न ठेवले नाही, तर अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने चालना मिळू शकत नाही. जर सरकारला आपल्या विधानावर संशय असतील तर बिहारमधील मतदारांचे सरकारने ऐकावे, असा सल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला दिला.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम
author img

By

Published : Oct 22, 2020, 4:15 PM IST

Updated : Oct 22, 2020, 10:15 PM IST

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी उपरोधिक टीका केली आहे. अर्थव्यवस्था ही सर्कशीमधील सिंहासारखी नाही. त्यामुळे रिंगमास्टरच्या काठीला प्रतिसाद देऊ शकत नाही, असा सरकारला उपरोधिक टोला चिदंबरम यांनी लगावला आहे

अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात बाजारावर निश्चित असते. मागणी, पुरवठा, खरेदीची क्षमता आणि लोकांच्या मागणीची सध्या उणीव जाणवत असल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगितले. पी. चिदंबरम म्हणाले, की जर सरकारने गरिबांच्या हातात पैसा आणि ताटात अन्न ठेवले नाही, तर अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने चालना मिळू शकत नाही. जर सरकारला आपल्या विधानावर संशय असतील तर बिहारमधील मतदारांचे सरकारने ऐकावे, असा सल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी मोदी सरकारला दिला. बिहारमध्ये काम नसणे आणि कमी उत्पन्न असणे, जगण्याबाबत त्यांचे विचार सरकारने जाणून घ्यावेत, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.

लोकांकडे वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, हे आरबीआय गव्हर्नर, सेबीचे चेअरमन आणि डीईएचे सचिव यांनी एका आवाजात सरकारला सांगावे, असा सल्ला चिदंबरम यांनी दिला. दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थव्यवहार मंत्रालयाचे सचिव यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे नुकतेच विधान केले आहे.

Last Updated : Oct 22, 2020, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.