नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आहे. या अर्थव्यवस्थेची अत्यंत अकार्यक्षम डॉक्टरकडून तपासणी होत असल्याची माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी सरकारवर टीका केली. सरकारने लोकांऐवजी देशातील २०० कोट्यधीशांच्या हातात पैसे दिले. त्यासाठी कॉर्पोरेट कराचा मार्ग अवलंबला.
पी. चिदंबरम म्हणाले, बेरोजगार आणि कमी मागणी झाल्याने भारत अधिक गरीब होत आहे. मागणीबरोबरही गुंतवणूकही कमी होत आहे. देशात भीती आणि अनिश्चितता आहे. मोदी सरकारच्या काळात मुख्य आर्थिक सल्लागार असलेले अरविंद सुब्रमण्यम यांनी अर्थव्यवस्था ही अतिदक्षता विभागात असल्याचे म्हटले होते. यावर चिदंबरम म्हणाले, रुग्ण अतिदक्षता विभागाच्या बाहेर आहे. अपात्र असलेले डॉक्टर हे रुग्णाकडे पाहत आहेत. ही रुग्णासाठी धोकादायक स्थिती आहे. 'सबका साथ, सबका विश्वास' या घोषणा देण्यात काय अर्थ आहे?
हेही वाचा-ऑटो एक्स्पो - मर्सिडिजमध्ये स्वयंपाकघर, बेडसारख्या सुविधा; एवढी आहे किंमत
मोदी सरकारने देशाला कोणत्या स्थितीत सोडले आहे, हे कोणताही पात्र डॉक्टर सांगू शकतो. यापूर्वी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पंगारिया यांनी सांगितले होते. पुढे ते म्हणाले, तुम्ही कोणते डॉक्टर आहात, ते मला जाणून घ्यायचे आहे. काँग्रेस ही अस्पृश्य आहे आणि विरोधी पक्ष म्हणून कोणताही चांगला विचार करू शकत नाही, असे सरकारला वाटते. त्यामुळे ते सरकारशी चर्चा करत नाहीत.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेवरील विश्वास आणखी डळमळीत; आरबीआयचे सर्व्हेक्षण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १६० मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थव्यवस्था आणि त्याच्या व्यवस्थापनावर बोलल्या नाहीत. तुम्ही इको चेंबरमध्ये राहत आहात. तुम्हाला केवळ तुमचा आवाज ऐकायचा आहे, अशी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांवर टीका केली.