ETV Bharat / business

'मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचे कारण चक्रीय नव्हे तर संरचनेतील बदल'

author img

By

Published : Sep 23, 2019, 6:18 PM IST

नोटांबदीपासून संरचनात्मक बदलाला सुरुवात झाली आहे. जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीने आयएल अँड एफएस कोसळली. त्याचा परिणाम म्हणून बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्र कोसळल्याचे अमित मित्रा यांनी म्हटले.

संग्रहित - अर्थव्यवस्था

कोलकाता - केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याचे म्हटले आहे. मात्र, पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी संचरनात्मक बदलामुळे सध्याची अर्थव्यवस्था मंदावल्याचे म्हटले आहे. ती चक्राकार (सायकलिकल) कारणाने मंदावले नसल्याचे म्हटले आहे. ते वार्षिक बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.

नोटांबदीपासून संरचनात्मक बदलाला सुरुवात झाली आहे. जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीने आयएल अँड एफएस कोसळली. त्याचा परिणाम म्हणून बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्र कोसळल्याचे अमित मित्रा यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, जेव्हा अर्थव्यवस्था यू आकाराने वाढत होती, तेव्हा नोटाबंदीने विकासदरावर परिणाम झाला. त्याचा परिणाम म्हणून जीडीपी हा ८.१५ टक्क्यावरून ७.१७ टक्क्यावर घसरला. जीएसटीची अंमलबजावणी करणे हा दुसरा मोठा संरचनात्मक बदल ठरल्याचा दावा मित्रा यांनी केला.

हेही वाचा-१७८ वर्षी जुनी थॉमस कुक कंपनी अखेर बुडीत; प्रवाशांना मोफत आणणार मायदेशी

जीएसटी नेटवर्कच्या चेअरमनशी बोलताना त्यांनी देश हा जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी तयार नव्हता, असे सांगितले होते. मात्र लोकशाहीत सरकारने एकतर्फी निर्णय घेतला. जीएसटीची १ जूलै २०१७ पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हेही वाचा-शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार 'मालामाल '; दोन दिवसात 10.50 लाख कोटींची संपत्ती भर

बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील आयएल अँड एफएस कोसळल्याने आता वित्तीय पुरवठ्याची मोठी कमतरता भासत आहे. अर्थसंकल्पीय उद्दिष्टाप्रमाणे १७.३ टक्के करसंकलन करण्यासाठी येत्या काही महिन्यात २८ टक्के करसंकलन करावे लागणार आहे. सध्या, अर्थव्यवस्था मंदावली असताना हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य आहे का, असा त्यांनी सवाल केला. उद्दिष्टाप्रमाणे अप्रत्यक्ष कराचे संकलन होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने खरगपूर येथील टाटा मेटालिकच्या विस्तारित प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्या प्रकल्पात कंपनी ६०० कोटी रुपये गुंतविणार आहे. यामधून ३ हजार ५०० जणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-या आठवड्यात तीन दिवसच बँक चालू राहणार; २६ व २७ सप्टेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा संप

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.