नवी दिल्ली - भारत आणि अमेरिकेमध्ये करार करण्यासाठी कोणतीही कृत्रिम कालमर्यादा असू नये, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रजनीश कुमार म्हणाले, मुद्दे गुंतागुंतीचे असताना करार घाईत करावेत, अशी आमची इच्छा नाही. अनेक निर्णयांमध्ये लोकांच्या जगण्यावर परिणाम करण्याची क्षमता आहे. त्यांचे दीर्घकाळ आर्थिक परिणाम होतात.
हेही वाचा-केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीच्या भरपाईपोटी दिले १९,९५० कोटी रुपये
भारताकडून व्यापाराबाबत फार चांगली वागणूक मिळत नसल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले की, संतुलित व्यापारासंदर्भात ते वक्तव्य केले आहे. प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
हेही वाचा-नमस्ते ट्रम्प...! '६० लाख ते १ कोटी जनता भारतात माझं स्वागत करेल'
भारत हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांच्या भेटीने द्विपक्षीय जागतिक रणनीतीचे संबंध अधिक बळकट होतील, असा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने विश्वास व्यक्त केला.