ETV Bharat / business

'कोरोना संपणार नसल्याच्या अनिश्चिततेने अर्थव्यवस्थांनाच लागणार मोठे टाळे'

कोरोनाच्या संकटाने गेल्या ३५ वर्षात सर्वात मोठी अनिश्चितता निर्माण झाल्याचे मत मॅकन्झी आणि कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.

author img

By

Published : May 29, 2020, 3:21 PM IST

प्रतिकात्मक -अर्थव्यवस्था
प्रतिकात्मक -अर्थव्यवस्था

नवी दिल्ली - कोरोना महामारी जगभरातून कधी जाणार, याबाबद अद्याप अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरातील अर्थव्यवस्थांना टाळे लागणार असल्याचे मॅकन्झी आणि कंपनीने म्हटले आहे. लोकांचे जीवन, उदरनिर्वाह आणि विश्वास पूर्ववत करायला पाहिजे, असे मत मॅकन्झीने अहवालात व्यक्त केले आहे.

सध्याची अनिश्चितता लवकरात लवकर संपविण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याची गरज आहे. यापूर्वीच्या संकटात आपण पाहिले आहे, जेव्हा अनिश्चितता वाढते, तेव्हा विश्वास कमी होतो. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्याला टाळे लागते. कोरोनाच्या संकटाने गेल्या ३५ वर्षात सर्वात मोठी अनिश्चितता निर्माण झाल्याचे मत मॅकन्झी आणि कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-भारत-चीन तणावामधील चीनची भूमीका ही अमेरिका अन् जगाला इशारा : जनरल हूडा

टाळेबंदीने मोठा आर्थिक धक्का बसला आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विकसित देशांच्या जीडीपीत ८ ते १३ टक्क्यांची घसरण झाली आहे. महामारी आल्यापासून अमेरिकेत एप्रिलमध्ये २०.५ दशलक्ष लोकांनी नोकऱ्या गमविल्या आहेत. सुरुवातीला कोरोनाबाबत असणारी अनिश्चितता कमी झाली आहे. मात्र, हे अनिश्चिततेचे प्रमाण अजूनही जास्त आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये अॅमेझॉनकडून सुखद धक्का.. सव्वा लाख हंगामी कर्मचाऱ्यांना 'ही' दिली ऑफर

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी तीन तिमाही ते पाच वर्षांहून अधिक काळ लागेल, असे मत व्यक्त केले आहे. तर ग्राहकांकडून पूर्ववत प्रतिसाद मिळण्यासाठी काही महिने ते वर्ष लागेल, असे अहवालात म्हटले आहे. टाळेबंदीत घरी काम करून कोरोनावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मात्र, या टाळेबंदीने अर्थव्यवस्थेचा नाश होणार आहे. त्याचा केवळ केवळ आर्थिक नाही तर थेट संपूर्ण माणसांवर परिणाम होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-बुकमायशो बंद, 270 कर्मचारी पाठवले अनिश्चित काळासाठी रजेवर

कोरोनाची आपण गती कमी केली आहे. आता, आपण अनिश्चितता संपविली पाहिजे. संरचनात्मक नाश होण्यापासून थांबवित पुन्हा विश्वास प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यावर लोकांचे जीवन आणि उदरनिर्वाह अवलंबून असेल, असेही अहवालात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.