ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटातही आयपीओ रोख्यांसह म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक

author img

By

Published : Apr 15, 2021, 5:28 AM IST

सार्वजनिक रोखे, आयपीओमधून उभा झालेला निधी आणि विदेशी गुंतवणूदार संस्थांच्या निधीत गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असतानाही म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

MFs see record investment
म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक

नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे जगभरात ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी भारतीय गुंतवणुकदारांचा सार्वजनिक रोखे आणि राईट्स इश्यू (रोखे) यांच्यामधील गुंतवणूक ही मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

सार्वजनिक रोखे, आयपीओमधून उभा झालेला निधी आणि विदेशी गुंतवणूदार संस्थांच्या निधीत गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असतानाही म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा-छळवणूक करणाऱ्यांचे संरक्षण थांबवा; 500 गुगल कर्मचाऱ्यांचे सुंदर पिचाईंना पत्र

  • मागील आर्थिक वर्षात कंपन्यांनी सार्वजनिक रोख्यांमधून 46,000 हजार कोटी रुपये उभे केले आहेत. त्यामध्ये आयपीओचाही समावेश आहे. तर दुसरीकडे कंपन्यांनी 64,000 कोटी रुपये राईट्स इश्यूमधून जमविले आहेत.
  • सार्वजनिक रोख्यांचे प्रमाण हे 115 टक्क्यांनी तर राईट्स इश्यूचे प्रमाण हे 15 टक्क्यांनी वाढले आहे.
  • आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपन्यांनी सार्वजनिक रोख्यांमधून 21,382 कोटी रुपये आणि राईट इश्यूमधून 55,670 कोटी रुपये जमविले होते.

हेही वाचा-जॅक मा यांना पुन्हा चीन सरकारचा दणका; अलिबाबाला ठोठावला 2.8 अब्ज डॉलरचा दंड

कॉर्पोरेट रोख्यांमध्येही तेजी-

कॉर्पोरेट रोख्यांमधील गुंतवणुकीत आणखीन वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपन्यांनी 2,000 कॉर्पोरेट रोख्यांमधून 7.82 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी जमविला होता. हे प्रमाण आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 13.5 टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षी कंपन्यांनी 1,821 कॉर्पोरेट रोख्यांमधून 6.90 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी जमविला होता.

म्युच्युअल फंडच्या बाजारपेठेचा झाला अधिक विस्तार

  1. म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक क्षेत्रातही सकारात्मक चित्र दिसून आले आहे.
  2. म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकदारांच्या संख्येत 31 मार्चपर्यंत 10 टक्क्यांनी वाढ होऊन 2.28 कोटी नोंद झाली आहे.
  3. तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकदारांची संख्या 2.08 कोटी होती.
  4. म्युच्युअल फंडच्या मालमत्ताअंतर्गत व्यवस्थापनामध्ये (असेट्स अंडर मॅनेजमेंट) 41 टक्के वाढ होऊन 31.43 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर यापूर्वी मार्च 2020 पर्यंत म्युच्युअल फंडच्या मालमत्ताअंतर्गत व्यवस्थापनामध्ये 22.26 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती.

हेही वाचा-कोरोनाची नवीन आव्हाने; बँकांच्या भांडवली अर्थसहाय्याचा केंद्र करणार पुनर्विचार

छोट्या शहरांमधून वाढतेय म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक

छोट्या शहरांमधून म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशातील सर्वात मोठ्या 30 शहरांना वगळता शहरांमधून असेट्स अंडर मॅनेजमेंटमधून मार्च 2021 मध्ये 5.35 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर मार्च 2020 पर्यंत 3.48 लाख कोटी रुपयांची असेट्स अंडर मॅनेजमेंटमधून गुंतवणूक झाली होती. या शहरांचे एकूण असेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये 17 टक्क्यांहून अधिक योगदान आहे.

कोरोना महामारीसाखे बाह्य धक्के बसत असतानाही भारतीय भांडवली बाजारपेठ ही बळकट आहे, हे दिसून आल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये 1,735 हून अधिक म्युच्युअल फंडच्या विविध वर्गवारीत योजना आहेत.

(कृष्णानंद त्रिपाठी, ईटीव्ही भारत)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.