हैदराबाद - कोरोना विषाणू जगभरात वणव्यासारखा पसरत असताना त्याचा व्यापार आणि उद्योगावर तात्काळ परिणाम दिसून येत आहे. सेऊलमधील ह्युदांईने १३ पैकी ७ वाहन प्रकल्प बंद केली आहेत. कारण चीनमधून वाहनांच्या सुट्ट्या भागांची दक्षिण कोरियामधून निर्यात होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
आंध्रप्रदेशमधून मिरची आणि महाराष्ट्रातून कापसाची चीनमध्ये होणारी निर्यात थंडावली आहे. त्याचा परिणाम देशातील स्थानिक शेतकऱ्यांसह आणि उद्योगांवर परिणाम होत आहे. मणिपूर या ईशान्येकडील राज्याने चीनसह दक्षिण आशियामधून पॅकिंगच्या अन्नपदार्थांच्या आयातीवर बंदी आणली आहे. यामध्ये एफएसएसएआयच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या अन्नपदार्थांच्या समावेश आहे. चीनबरोबर व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाशी संबंध असलेल्या नेत्यांवर कोरोनाचा विशेष प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्यापूर्वी नियोजन करण्याची गरज असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी म्हटले.
हेही वाचा-कोरोनाचा धसका : चीनसह म्यानमारमधून आयात होणाऱ्या अन्नपदार्थांवर मणिपूरची बंदी
-सार्सहून कोरोना धोकादायक
आयएचआयएस मर्किटच्या अहवालानुसार कोरोनाचा जागतिक आर्थिक व्यवस्थेवर सार्सहून अधिक वाईट परिणाम होणार आहे. सार्स २००३ मध्ये जगातील अनेक देशात पसरला होता. त्यावेळी चीन हा जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. तर चीनचे जागतिक जीडीपीत ४.२ टक्के योगदान होते.
सध्या चीन हा जगात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. तर चीनचे जागतिक जीडीपीत १६.३ टक्के योगदान आहे. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था घसरली तर त्याचे पडसाद जगभरात उमटतात, असे अहवालात म्हटले आहे. चीन हा मध्यपूर्वेतील देशांकडून खनिज तेलाचे आयात करणारा प्रमुख देश आहे. त्यामुळे आशिया-पॅसिफक प्रदेशांसह व मध्यपूर्वेत चीनच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम जाणवणार आहे. चीनकडून २०१९ मध्ये रोज १३.९ दशलक्ष खनिज तेलाच्या बॅरलची मागणी करण्यात येत होती. हे जागित बाजारपेठेतील एकूण मागणीच्या १४ टक्के प्रमाण आहे. हीच परिस्थिती कायम राहून मार्चमध्ये सुधारणा झाली तर जागतिक जीडीपीत जानेवारी-मार्चदरम्यान ०.८ टक्के होईल, असा अहवालात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एप्रिल-जून दरम्यान जीडीपीत ०.५ टक्के होईल, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-'सैन्यदलाच्या सुविधा मिळाल्याने शस्त्रास्त्रे वेगाने विकसित होण्यात मदत होणार'