नवी दिल्ली - सलग चौथ्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनाचा वृद्धीदरात घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या पायाभूत ८ क्षेत्राच्या वृद्धीदरात १.५ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. तर पाच पायाभूत क्षेत्राचा वृद्धीदर हा उणे राहिला आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ८ पायाभूत क्षेत्रांचा वृद्धीदर हा ३.३ टक्क्यांनी वाढला होता. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, स्टील आणि वीजनिर्मिती यांच्या उत्पादनात नोव्हेंबरमध्ये घसरण झाली. चालू वर्षात नोव्हेंबरमध्ये सिमेंटचे उत्पादन हे ४.१ टक्के तर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ८.८ टक्के सिमेंटचे उत्पादन राहिले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तेलशुद्धीकरणाच्या उत्पादनात नोव्हेंबरमध्ये ३.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर खतनिर्मितीत १३. ६ टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा-रुपयाची डॉलरच्या तुलनेत वर्षभरात १५९ पैशांची घसरण
एप्रिल-नोव्हेंबरमध्ये पायाभूत क्षेत्राचा वृद्धीदर हा जैसे थे (शून्य टक्के) राहिला आहे. तर गतवर्षी पायाभूत क्षेत्राचा वृद्धीदर हा ५.१ टक्के होता. गतवर्षी ऑगस्टपासून आठ मुलभूत क्षेत्रांचा वृद्धीदर हा उणे राहिला आहे.
हेही वाचा-'या' स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅपची सुविधा १ जानेवारीपासून होणार बंद