नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला किंचितसा दिलासा मिळाला आहे. देशातील मुख्य आठ उद्योगांचा वृद्धीदर हा डिसेंबर २०१९ मध्ये १.३ टक्के झाला आहे. गेली चार महिने आठ उद्योगांचा वृद्धीदर हा घसरला होता. कोळसा, खते आणि तेलशुद्धीकरण यांचे उत्पादन वाढल्याने आठ उद्योगांनी वृद्धीदर नोंदविला आहे.
मुख्य आठ उद्योगांचा वृद्धीदर वाढला असला तरी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत वृद्धीदर कमी राहिला आहे. वर्ष २०१८ च्या डिसेंबर महिन्यात मुख्य आठ उद्योगांचा वृद्धीदर हा २.१ टक्के होता. खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वीजनिर्मिती यांचे प्रमाण डिसेंबरमध्ये घसरले आहे. तर कोळसा शुद्धीकरण उत्पादने आणि खते यांच्या उत्पादनात वृद्धी झाली आहे.
हेही वाचा - सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्यासाठी टीमचे कठोर प्रयत्न
स्टील उद्योगाचा वृद्धीदर घसरून १.९ टक्के तर सिमेंट उद्योगाचा वृद्धीदर घसरून ५.५ टक्के झाला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान महत्त्वाच्या उद्योगांचा वृद्धीदर हा ०.२ टक्के राहिला आहे. तर मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान महत्त्वाच्या उद्योगांचा वृद्धीदर हा ४.८ टक्के होता.
हेही वाचा - जाणून घ्या, आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे