नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आर्थिक सर्वेक्षणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक सर्वेक्षणात केवळ सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करत आर्थिक सर्वेक्षणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, केंद्र सरकारने घेतलेल्या उत्कृष्ट निर्णयांची माहिती आर्थिक सर्वेक्षणात छापण्यात आली नाही.
हेही वाचा-जाणून घ्या, अर्थसंकल्पात वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञा
कधीकाळी आर्थिक सर्वेक्षण हे लोकांना अर्थव्यवस्था सोप्या भाषेत समजण्याचे माध्यम होते. लोकांना आर्थिक सर्वेक्षणातून येणाऱ्या अर्थव्यवस्थेचा अंदाज येत होता. सध्या, सर्वेक्षण हे वेगळ्या हेतुसाठी दिसत आहे. मात्र, हेतू स्पष्ट नाही. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे केंद्र सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केलेल्या दूरदर्शी प्रयत्नांचे स्वत:हून कौतुक करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र १५ ऐवजी १३ फेब्रुवारीला संपणार
दरम्यान, केंद्र सरकारकडून यंदा आर्थिक सर्वेक्षण अहवाल छापण्यात आला नाही. आर्थिक सर्वेक्षण अहवाल केवळ डिजीटल स्वरुपात उपलब्ध करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत.
संबंधित बातमी वाचा-जाणून घ्या, आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
काय म्हटले आहे आर्थिक सर्वेक्षण अहवालात?
- आर्थिक सर्वेक्षण अहवालात पुढील आर्थिक वर्षात विकासदर वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. असे असले कोरोनापूर्वीच्या स्थितीला येण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेला दोन वर्षे लागणार असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नवीन कृषी कायद्याचे जोरदार समर्थन करण्यात आले आहे. मुक्त बाजाराच्या नवीन कायद्यामुळे नवीन युग येणार असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. नवी कृषी कायद्यामुळे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.