नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयचे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणीसाठी नेण्यात येत होते. यावेळी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ५ टक्के असे उत्तर देत घसरलेल्या जीडीपीवरून सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.चिदंबरम यांनी आर्थिक धोरणावरून मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. त्यांना विशेष सीबीआय न्यायालयात नेले जात असतानाही त्यांनी सरकारची घसरलेल्या जीडीपीवरून खिल्ली उडविली.
-
A quick reminder by @PChidambaram_IN on why he's feared by the BJP govt. #ModiMadeEconomicCrisis pic.twitter.com/9XOdVf6saT
— Congress (@INCIndia) September 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A quick reminder by @PChidambaram_IN on why he's feared by the BJP govt. #ModiMadeEconomicCrisis pic.twitter.com/9XOdVf6saT
— Congress (@INCIndia) September 3, 2019A quick reminder by @PChidambaram_IN on why he's feared by the BJP govt. #ModiMadeEconomicCrisis pic.twitter.com/9XOdVf6saT
— Congress (@INCIndia) September 3, 2019
हेही वाचा-आयडीबीआयला मिळणार ९ हजार कोटींचे भांडवली अर्थसहाय्य; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पी. चिदंबरम हे गेली दोन आठवडे सीबीआयच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांना विशेष सीबीआय न्यायालयात नेले जात असताना पोलीस कोठडीवर काय बोलू इच्छित आहात का, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. यावेळी पोलिसांच्या गराड्यात असलेल्या चिदंबरम यांनी ५ टक्के असे उत्तर दिले. त्यावर पत्रकाराने ५ टक्के म्हणजे काय असे विचारले. यावर चिदंबरम यांनी काय आहे ५ टक्के? असे उलट सवाल केला. पत्रकाराने जीडीपी असे उत्तर देताच चिदंबरम स्मितहास्य करून निघून गेले.
हेही वाचा-स्थावर मालमत्ता क्षेत्राला लवकरच मिळणार आर्थिक सुधारणांचा 'टेकू'
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी घसरून ५ टक्के झाला आहे. हे जीडीपीचे प्रमाण गेल्या सहा वर्षात सर्वात कमी आहे.
हेही वाचा-ऊसापासून साखरेऐवजी इथेनॉलची निर्मिती केल्यास सरकार कारखान्यांना देणार हमीभाव