ETV Bharat / business

गोंधळलेल्या सरकारचे कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी श्रेय घेण्यावर लक्ष - अमर्त्य सेन - Amartya Sen on COVID situation

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सेन म्हणाले, की आधीच भारत सामाजिक विषमतेला सामोरे जात असताना महामारीत मंदावलेला विकासदर आणि बेरोजगारीचे वाढलेले विक्रमी प्रमाण अशा संकटांनी आणखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था आणि सामाजिक एकतेचे अपयश होणे हे महामारीच्या हल्ल्याच्या अपयशाचे मूळ आहे.

Amartya Sen
अमर्त्य सेन
author img

By

Published : Jun 5, 2021, 5:26 PM IST

मुंबई - भारताचे गोंधळलेले सरकार हे कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी कृतीचे श्रेय घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे स्किझोफ्रेनियासारखी अवस्था होऊन मोठी संकटे निर्माण होत असल्याचे मत नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमात शुक्रवारी बोलत होते.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन म्हणाले, की उच्च प्रतिकारक्षमता आणि औषधी कंपन्यांची उत्पादन क्षमता या कारणांनी भारत हा कोरोनाशी लढण्याकरता चांगल्या स्थितीत होता. गोंधळलेल्या सरकारमुळे महामारीला सक्षमतेने भारत तोंड देऊ शकला नाही, अशी टीका सेन यांनी केले. कोरोना महामारीच्या संकटातून जगाला भारताने वाचविल्याची थाप सरकारने मारली. त्याचवेळी संकटाची निर्मिती होण्याची सरकारने एकप्रकारे परवानगी दिली. त्यामधून अनेकांच्या जीवनाला कोरोनाने विळखा घातल्याचे मत अर्थतज्ज्ञ सेन यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-महागाई-विकासदरातील संतुलनाकरिता आरबीआयकडून व्याजदर स्थिर - अर्थतज्ज्ञांचे मत

आर्थिक आणि सामाजिक धोरणातही मोठा संरचनात्मक बदल करावा-

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सेन म्हणाले, की आधीच भारत सामाजिक विषमतेला सामोरे जात असताना महामारीत मंदावलेला विकासदर आणि बेरोजगारीचे वाढलेले विक्रमी प्रमाण अशा संकटांनी आणखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था आणि सामाजिक एकतेचे अपयश होणे हे महामारीच्या हल्ल्याच्या अपयशाचे मूळ आहे. शिक्षणातील मर्यादेमुळे कोरोनाची लक्षणे आणि उपचारातील पद्धतीबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या संरचनात्मक बदल करावा, अशी विनंती अमर्त्य सेन यांनी केली. तसेच आर्थिक आणि सामाजिक धोरणातही मोठा संरचनात्मक बदल करावा, अशी अपेक्षा सेन यांनी व्यक्त केली.

हेही वाचा-नवीन डिजीटल कायद्याच्या अंमलबजावणीकरिता केंद्राची ट्विटरला अंतिम नोटीस

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका-

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे नवीन 4 लाख रुग्ण देशात आढळत होते. तर रोज सरासरी 4,500 जणांच्या मृत्यूचे प्रमाण राहिले आहे. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची आकडेवारी विविध राज्यांनी कमी दाखविल्याचा आरोपही माध्यमांतून करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वीच केंद्र सरकारने महामारीवर विजय मिळविल्याची घोषणा केल्याने संकट निर्माण झाल्याची टीका अनेक तज्ज्ञ आणि प्रसिद्ध व्यक्तींनी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.