नवी दिल्ली - आयडीबीआय बँकेला ९ हजार कोटी रुपयांचे भांडवली अर्थसहाय्य मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आयडीबीआयला मिळणाऱ्या ९ हजार कोटींपैकी केंद्र सरकार ४ हजार ५५७ कोटी रुपये तर एलआयसी ४ हजार ७०० कोटी रुपये देणार आहे. सरकारकडून आयडीबीआयला एकाच टप्प्यात देण्यात येणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा-ऊसापासून साखरेऐवजी इथेनॉलची निर्मिती केल्यास सरकार कारखान्यांना देणार हमीभाव
आर्थिक तोट्यात सापडलेल्या आयडीबीआयला एलआयसीने दिला आहे मदतीचा हात -
एलआयसीने जानेवारी २०१९ मध्ये आयडीबीआय बँकेचा ५१ टक्के हिस्सा घेतला. यामुळे एलआयसीने बँकिंग क्षेत्रात प्रवेश घेतला. गतवर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एलआयसीला आयडीबीआय बँकेचे प्रमोटर म्हणून मान्यता दिली.
हेही वाचा-केरळच्या अर्थमंत्र्यांचा वाहनांवरील जीएसटी कपातीला विरोध
२०१८ मधील तिसऱ्या तिमाहीदरम्यान आयडीबीआय बँकेचा ४ हजार १८५.४८ कोटींचा तोटा झाला होता. तर २०१७ मध्ये तिसऱ्या तिमाहीदरम्यान आयडीबीआय बँकेला १ हजार ५२४.३१ कोटींचा तोटा झाला होता.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ७६९ अंशाने कोसळला ; निफ्टी १०,८०० हून खाली