नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे डिसेंबरमध्ये १ लाख ३ कोटी १८४ कोटी रुपये झाले आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे तिकिटांचे दर आजपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या बातम्यांचा संक्षिप्त रुपात घेतलेला वेध.
डिसेंबरमध्ये जीएसटीचे १,०३,१८४ कोटींचे संकलन
नवी दिल्ली - वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे डिसेंबरमध्ये १ लाख ३ कोटी १८४ कोटी रुपये झाले आहे. तर केंद्रीय जीएसटीचे प्रमाण हे १९ हजार ९६२ कोटी रुपये आहे. तर राज्य जीएसटीचे प्रमाण हे २६ हजार ७९२ कोटी रुपये आहे. आयजीएसटीचे प्रमाण ४८ हजार ९९ कोटी रुपये आहे. यामध्ये २१ हजार २९५ कोटी रुपयांच्या आयात शुल्काचाही समावेश आहे. तर उपकराचे प्रमाण हे ८ हजार ३३१ कोटी रुपये आहे. यामध्ये ८४७ कोटी रुपयांच्या आयात शुल्काचा समावेश आहे.
हेही वाचा-अल्पबचत योजना : जानेवारी-मार्च तिमाहीत व्याज दर 'जैसे थे'
लांब पल्ल्याच्या रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ
नवी दिल्ली - भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे तिकिटांचे दर आजपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्लीपर क्लासमध्ये प्रति किलोमीटर २ पैसे, ३ एसी, २एसी आणि एसी प्रथम वर्गात प्रति किलोमीटर ४ पैसे दर वाढणार आहेत. पॅसेंजर रेल्वेच्या तिकिट दरात प्रति किलोमीटर १ पैशांनी वाढ होणार आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना तिकीट दरासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा-विजय मल्ल्याला दणका; विशेष न्यायालयाने बँकांना 'ही' दिली परवानगी
'सबका विश्वास योजने'ला मुदत वाढ
नवी दिल्ली - केंद्रीय वित्तीय मंत्रालयाने 'सबका विश्वास योजना' या योजनेला १५ जानेवारीपर्यंत १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे. या योजनेत सेवा कर आणि केंद्रीय अबकारी शुल्कात दिलासा देण्यात येतो.