नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला. यामध्ये कॉर्पोरेट करात सवलत, स्टार्टअपसाठी टीव्ही, महिला बचतगटांना १ लाखापर्यंत कर्जाचे वाटप अशा विविध घोषणांचा समावेश आहे.
दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या एनडीए सरकारपुढे मतदारांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
- प्राप्तीकर भरण्यासाठी पॅन कार्डऐवजी आधार कार्डही चालणार, कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर आरबीआय थेट नियंत्रण ठेवणार
- अनिवासी भारतीयांना देशात आल्यानंतर आधार कार्डची सुविधा मिळणार
- स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत प्रत्येकाला सहभागी होता येणार
- महिला उद्योजकांना लाभ देण्यात येणार
- 1 ते 20 रुपयापर्यंतची नवी नाणी चलनात येणार
- स्टार्टअपसाठी नवे टीव्ही चॅनेल सुरू करण्यात येणार
- प्रत्येकाला 2022 पर्यंत पाणी देण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना
- देशात नवे 10 क्लस्टर तयार करण्यात येणार
- देशात 20 बिझनेस इन्क्यूबेटर स्थापन करण्यात येणार
- वार्षिक दोन ते पाच कोटी उत्पन्न असणाऱ्यांना तीन टक्के सरचार्ज
- पाच कोटी रुपयांपर्यंत जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सात टक्के सरचार्ज
- इलेक्ट्रिक कार घेतल्यास दीड लाखांपर्यंत करसवलत देण्याचा प्रस्ताव
- जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद
- ग्रामसडक योजनेसाठी 80 हजार कोटींची तरतूद
- पेट्रोल-डिझेलसह सोन्यावरील आयात शुल्क वाढणार