ETV Bharat / business

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेला मोठे यश - अर्थमंत्री निर्मला सितारामन - अर्थसंकल्प २०२०

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केंद्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. बहुप्रतिक्षित असलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास तरतूदी करण्यात आल्या आहेत.

Union Budget 2020
बहुप्रतिक्षित असलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास तरतूदी करण्यात आल्या आहेत.
author img

By

Published : Feb 1, 2020, 1:47 PM IST

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केंद्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. बहुप्रतिक्षित असलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास तरतूदी करण्यात आल्या आहेत.

गरोदर आणि लहान बालके असलेल्या महिला भारत सरकारच्या प्राधान्यक्रमावर असतील, असे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेचे कौतुक केले. संबंधित योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे त्या म्हणाल्या. तसेच 35 हजार 600 कोटींची तरतूद केली आहे. महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावला असून बालविवाहाचे प्रमाण देखील घटल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा; ५ लाखापर्यंतच्या रकमेवर विमा संरक्षण

याचसोबत त्यांनी मुलांपेक्षा मुलींमधील शिक्षणाचा सरासरी स्तर उंचावल्याचे सांगितले. सहा लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांकडे स्मार्टफोन्स पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.

अर्थसंकल्पातील महिलांसाठीचे मुद्दे

  • महिलांच्या पोषणासाठी 35 हजार 600 कोटींची तरतूद (2020-2021)
  • 28 हजार 600 कोटींचा खास महिलांसाठी निधी जाहीर
  • मुलींच्या लग्नाचे वय निश्चित करण्यासाठी समितीचे गठन

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.