नवी दिल्ली - 'केंद्र सरकारने केवळ विराम घेतला आहे. कोरोनाच्या संकटाचा फटका बससेल्या क्षेत्रांसाठी आणखी सुधारणा जाहीर केल्या जाणार आहे', असे केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. भारताला मेक इंडियातून 'आत्मनिर्भर भारत' करणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला.
केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी विविध पावले उचल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की घोषणांनी विराम घेतला असून कृती केली जाणार आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्र महत्त्वाचे आहे. त्यामधून केवळ जीडीपीत योगदान नाही, तर लाखो लोकांना रोजगार दिला जातो. जर त्यांना आणि इतरांना मिळाले नसेल, तर आम्ही खूप खुले आहोत, असेही ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा-दिलासादायक! रेल्वे तिकिटाचे आरक्षण सर्वांसाठी ऑनलाईनसह ऑफलाईन खुले
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुमारे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज पाच टप्प्यात जाहीर केले आहे.
हेही वाचा-लाल चिखल! टोमॅटोचे दिल्लीसह प्रमुख महानगरात कोसळले दर