वॉशिंग्टन - कोरोनाचे जगात सर्वाधिक मृत्यू झालेल्या अमेरिकेपुढे बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. नोकरी गमाविल्यानंतर ४४ लाख बेरोजगार अमेरिकन नागरिकांनी गेल्या आठवड्यात सरकारी मदतीसाठी अर्ज केले आहेत. कोरोनाच्या फटक्याने व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाल्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यापासून गेल्या काही आठवड्यांत २.६ कोटी नागरिकांनी सरकारकडे मदतीसाठी अर्ज केले आहेत. कोरोनामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागत आहेत. सहापैकी एक अमेरिकन मार्चच्या मध्यापासून नोकरी गमावित आहे. देशातील नागरिकांनी नोकऱ्या गमाविण्याचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये २० टक्के होईल, असा अर्थतज्ज्ञ अंदाज व्यक्त करत आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा: सरकार १५.४० कोटी एचसीक्यू गोळ्यांचा देशात करणार पुरवठा
अमेरिकेतील उद्भवलेल्या १९३० च्या महामंदीहून ही मोठी मंदी असल्याचे काही अर्थतज्ज्ञ दावा करत आहेत. नोकऱ्या गमाविण्याचे वाढलेले प्रमाण व आर्थिक जीवनमानावर झालेला परिणाम या कारणांनी अनेक नागरिक विविध राज्यांत आंदोलन करत आहेत. अमेरिकेत पुन्हा उद्योग सुरू करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
हेही वाचा-'राज्यांची आर्थिक स्थिती प्रचंड संकटात; तातडीने मदतीची गरज'
काही राज्यांतील राज्यपालांनी आरोग्य यंत्रणेने इशारा देवूनही टाळेबंदीमधील निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे आणखी संसर्ग वाढण्याची भीती आहे. जॉर्जियामध्ये जीम व हेअर सलून शुक्रवारी सुरू होण्याची शक्यता आहे.