नवी दिल्ली - ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांनी सहा वर्षांनंतर राजीनामा दिला आहे. नुकतेच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या झोमॅटोमध्ये गुप्ता हे पुरवठा विभागाचे प्रमुख होते.
गौरव गुप्ता यांनी राजीनाम्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठविला आहे. त्यांनी ई-मेलमध्ये म्हटले, की मी जीवनात नवीन वळण घेत आहे. झोमॅटोमधील 6 वर्षांच्या अनुभवाचा काही भाग घेत नवीन अध्याय सुरू करणार आहे. आता, झोमॅटोला पुढे जाण्यासाठी महान टीम आहे. हा माझ्यासाठी पर्यायी रस्ता निवडण्याचा वेळ आहे. हे लिहत असताना मी खूप भावनिक झालो आहे. सध्या कसे वाटत आहे, हे सांगण्याकरिता कोणतेही शब्द हे न्याय ठरू शकतील, असे मला वाटत नाही.
हेही वाचा-सीए अंतिम परीक्षेत बहिण-भावाचा डंका : बहिण नंदिनी देशातून पहिली तर सचिनला मिळाली 18 वी रँक
झोमॅटोचे सीईओ गोयल यांनी गुप्ता यांचे मानले आभार-
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी गुप्ता यांचे आभार मानले आहेत. गोयल यांनी म्हटले, आजपर्यंत सर्वात चांगले मित्र राहिलात, त्याबद्दल आभारी आहे. तुमच्याशिवाय झोमॅटोतील दैनंदिन जीवनाची कल्पना करू शकत नाही. गेल्या सहा वर्षांचा प्रवास हा अद्भुत होता. समोर आणखीन प्रवास आहे. की कंपनीला पुढे नेण्यासाठी महान टीम आणि नेतृत्व असल्याबद्दल आभारी आहे.
हेही वाचा-14 सप्टेंबर : हिंदी दिवस का साजरा केला जातो?
कंपनीने निवडक व्यवसाय बंद करण्याची नुकतेच केली घोषणा-
झोमॅटोने किराणा माल आणि न्यूट्रास्युटिकल व्यवसाय बंद करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही दिवसातच गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. न्यूट्रास्युटिकल व्यवसाय सुरू करणारे गुप्ता हे पहिले व्यक्ती होते.
हेही वाचा-कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा