ETV Bharat / business

सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि झी एन्टरटेनमेंटमध्ये विलिनीकरण करार, झीच्या संचालक मंडळाने दिली मंजुरी - पुनीत गोयंका

झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्सच्या विलिनीकरणानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या कंपनीचे सीईओ आणि व्यस्थापकीय संचालक पद हे पुनीत गोयंका यांच्याकडे येणार आहे. नवीन कंपनीमध्ये झी एन्टरमेंटकडे 47.07 टक्के हिस्सा असणार आहे.

झी एन्टरटेनमेंट
झी एन्टरटेनमेंट
author img

By

Published : Sep 22, 2021, 4:37 PM IST

Updated : Sep 22, 2021, 6:35 PM IST

नवी दिल्ली - माध्यम विश्वातील मोठील बातमी आहे. झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे विलिनीकरण होणार आहे. याबाबत झीच्या संचालक मंडळाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीमध्ये सोनीकडून 11,605.94 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्सच्या विलिनीकरणानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या कंपनीचे सीईओ आणि व्यस्थापकीय संचालक पद हे पुनीत गोयंका यांच्याकडे येणार आहे. नवीन कंपनीमध्ये झी एन्टरमेंटकडे 47.07 टक्के हिस्सा असणार आहे. तर सोनी पिक्चर्सकडे 52.93 टक्के हिस्सा असणार आहे. विलिनीकरणानंतर येणाऱ्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा-महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर

कंपनीच्या संचालक मंडळाचे सोनी ग्रुपमध्ये होणार विलिनीकरण

दोन्ही कंपन्यांकडील टीव्ही व्यवसाय, डिजीटल संपत्ती, प्रोडक्शन ऑपरेशन आणि प्रोग्रॅम लायब्ररीत विलीन होणार आहे. झील आणि सोनी पिक्चर नेटवर्क इंडियामध्ये एक्सक्यूलिझव्ह बिगर बंधनकारक करार झाला आहे. हा करार पुढील 90 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.

हेही वाचा-मोदी सरकारचा मोठा निर्णय; सेतू सुविधा केंद्रांमध्ये रेशनकार्डाशी संबंधित सेवा मिळणार!

संचालक मंडळात सोनी ग्रुपकडे अधिक अधिकार

सध्याच्या प्रमोटर फॅमिली झीकडील शेअरहोल्डिंगचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढवून 20 टक्के करण्याचा पर्याय असणार आहे. तर संचालक मंडळात सोनी ग्रुपकडे अधिक अधिकार असणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाने शेअर गुंतवणूकदार आणि हिस्सेदारांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

हेही वाचा-बर्गरसोबत खाल्ला विंचू; तरुणाची तब्येत बिघडली... पाहा VIDEO

Last Updated : Sep 22, 2021, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.