नवी दिल्ली – येस बँक रेड हेर्रिंग प्रॉस्पेक्ट्समधून 15 हजार कोटी रुपये जमविणार आहे. यामधून येस बँक एफपीओ बाजारात आणणार आहे.
येस बँकेच्या एफपीओची शेवटची मुदत 17 जुलै 2020 आहे. या आठवड्यात येस बँकेला संचालक मंडळाच्या सीआरसी समितीने निधी जमविण्यासाठी एफपीओ बाजारात आणण्यासाठी परवानगी दिली आहे. बँकेने रेड हेर्रिंग प्रॉस्पेक्टस 7 जुलै 2020 रोजी दाखल केल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे.
एफपीओचे मूल्य हे 15 हजार कोटी रुपये आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या 200 कोटी रुपयांच्या शेअरचा हिस्सा आहे. स्टेट बँकेच्या कार्यकारी समितीने येस बँकेच्या एफपीओमध्ये 1,760 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेसाठी 13 मार्चला नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये विविध 8 वित्तीय संस्थांकडून येस बँकेला 10 हजार कोटी रुपये मिळाले आहे. तर येस बँकेकडून 6 हजार 50 कोटी रुपये मिळाले आहेत.