नवी दिल्ली - आयटी कंपनी यंदा ४०० जणांना नोकऱ्या देण्याचे नियोजन करत आहे. डिजीटायझेशन मागणी वाढत असल्याने या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सध्या वुरममध्ये ६०० कर्मचारी नोकऱ्या करत आहेत. नवीन ४०० नोकऱ्या अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये प्रवेश पातळी ते वरिष्ठ पातळीपर्यंतच्या पदांसाठी आहेत. कंपनीकडून विक्री, विपणन, सर्व्हर सपोर्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अभियांत्रिकी गुणवत्ता, तंत्रज्ञान विकास आणि कामकाज यासाठी कर्मचारी घेतले जाणार आहेत.
हेही वाचा-चांदीच्या दरात १०७३ तर सोन्याच्या दरात १०५ रुपयांची वाढ
वुरम पीपल टीमचे संचालक सुरेश कुमार सी म्हणाले की, आम्ही संपूर्णपणे नोकरी भरतीसाठी डिजीटलचा वापर करणार आहोत. यामध्ये कॅम्पस ड्राईव्हसारखा समावेश आहे. ज्यांना आवड आणि नवीन कल्पनांना दिशा देवू शकणार आहेत, अशा उमेदवारांच्या शोधात असल्याचे सुरेश कुमार सी यांनी सांगितले.
हेही वाचा-टोलनाके काढून टाकण्यात येणार; जीपीएसवर आधारित टोल संकलन सुरू होणार
दरम्यान, कोरोना महामारीमुळे देशातील रोजगारामध्ये मोठी घसरण झाली आहे. अशात आयटी क्षेत्राने चांगला विकासदर नोंदविला आहे.