बंगळुरू - कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीतही व्हिजनेट इंडिया कंपनीने चालू वर्षात सुमारे १ हजार ५०० कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले आहे.
व्हिजनेट इंडियाने मागील वर्षी सुमारे २ हजार व्यवसायिकांना नोकऱ्या दिल्या आहेत. व्हिजनेट कंपनीने मॉर्टेज बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंटच्या (बीपीएम) कामासाठी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार आहे. हे काम सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांना घरी बसूनही करता येणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आलोक बन्सल यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाने ड्रॅगनवरही परिणाम; ४४ वर्षानंतर अर्थव्यवस्थेची प्रथमच घसरण
पुढे बन्सल म्हणाले, की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दर्जेदार बुद्धिमत्ता असल्याचा आम्हाला विश्वास आहेत. त्यांना करिअरची संधी देताना आनंद होत आहे. बहुतांश सर्व जागा येत्या दोन आठवड्यात भरण्यात येणार आहेत. व्हिजनेट कंपनीने नुकतेच बंगळुरूमध्ये कार्यालय सुरू करणार असल्याचे जाहीर केले. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित; वेतनवाढीला यंदा स्थगिती - टीसीएस