ETV Bharat / business

मॅक्डोनाल्डचे भारतीय भागीदार विक्रम बक्षींना देश सोडून जाण्यास मनाई

विक्रम बक्षींना देश सोडून जाण्यासाठी डीआरटी, डीआएटी आणि एनसीएलएटीची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच हुडकोची थकित असलेले सुमारे १७५ कोटी रुपये भरावे लागणार आहे.

संग्रहित - मॅक्डोनाल्ड
author img

By

Published : Sep 19, 2019, 1:10 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी लवाद न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) फसवणुकीचे आरोप असलेल्या मॅक्डोनाल्डचे भारतीय भागीदार विक्रम बक्षींना दणका दिला आहे. एनसीएलएटीने बक्षींना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे.

विक्रम बक्षी यांना परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास एनसीएलएटीचे न्यायाधाीश एस.जे.मुखोपध्याय आणि बन्सी भट यांनी मनाई केली आहे. बक्षींना देश सोडून जाण्यासाठी डीआरटी, डीआएटी आणि एनसीएलएटीची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच हुडकोची थकित असलेले सुमारे १७५ कोटी रुपये भरावे लागणार आहे.

हेही वाचा-भारताला पुन्हा जीएसपीचा दर्जा द्यावा; अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींची ट्रम्प सरकारला विनंती

विक्रम बक्षी हे विविध न्यायालयांमधील खटल्यांना सामोरे जात आहेत. माँट्रेऑक्स रिसॉर्ट्सकडून टिस हजारी न्यायालयाात बक्षींनी फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. या फसणुवकीप्रकरणी ११ ऑक्टोबरला न्यायालयाने समन्स बजाविले होते.
मॅकडॉनाल्ड आणि विक्रम बक्षी यांच्यामधील व्यवहाराची प्रक्रिया निरंक दाखविणे बंधनकारक असणार आहे. मागील सुनावणीत एनसीएलएटीने बक्षी यांना हुडकोची रक्कम भरण्यासाठी शेवटची संधी दिली होती. बक्षींनी १९४ कोटी रुपये भरावेत, असा हुडकोने दावा केला आहे.

हेही वाचा-केंद्र सरकारकडून खुल्या सेल टीव्ही पॅनेलवरील आयात शुल्कात ५ टक्के कपात

टिस हजारी न्यायालय ( नवी दिल्ली) माँट्रेऑक्स रिसॉर्ट्सच्या फसवणूक प्रकरणी बक्षींना ११ ऑक्टोबरला समन्स पाठविले होते. माँट्रेऑक्स रिसॉर्ट्सचे दीपक खोसला यांनी बक्षीविरोधात फसवणूक, घोटाळा आणि बनावटगिरी केल्याची तक्रार केली होती.
तसेच न्यायालयाने कंपनीचे सचिव विकास जेरा, वाडिया प्रकाश आणि संचालक (वित्त), विनोद सुर्हा यांनाही समन्स पाठविले होते. नोंदविण्यात आलेलेल्या गुन्हे अजामिनपात्र आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असणार आहेत.

हेही वाचा-शेअर बाजारात २०० अंशाने पडझड ; टीसीएस, आयसीआयसीआय बँकेंचे घसरले शेअर

विक्रम बक्षी यांनी माँट्रेऑक्स रिसॉर्ट्सचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या रिसॉर्टकडे पंचतारांकित लीला हॉटेल आणि कासाउली येथे स्पा आहे. कंपनीच्या वार्षिक बैठक ३० सप्टेंबर २००६ ला दाखविण्यात आली. यामध्ये सोनिया खोसला हे नवी दिल्लीत असल्याचे वार्षिक अहवालात म्हटले आहे. मात्र त्यावेळी सोनिया या चीन आणि इंग्लंडमध्ये होत्या, असा दावा माँट्रेऑक्स रिसॉर्ट्सचे दीपक खोसला यांनी केला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.