कोलकाता – सरकारी बँक असलेल्या युको बँकेने सलग दोन तिमाहीत निव्वळ नफा कमविला आहे. या आर्थिक कामगिरीनंतर युको बँक ही भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या योग्य सुधारणात्मक आकृतीबंधाच्या (पीसीए) कार्यवाईतून बाहेर येण्यासाठी तयार आहे.
वाढते बुडीत कर्ज आणि मालमत्तेमधून मिळणाऱ्या परताव्यातील घसरणीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने युको बँकेवर पीसीएची मे 2017 मध्ये कारवाई केली होती. सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पीसीएच्या कारवाईमधून बाहेर पडण्यासाठी आम्ही आरबीआयशी संपर्क साधण्यासाठी तयार आहोत. बँकने दोन तिमाहीमध्ये निव्वळ नफा कमविला आहे.
- बुडीत कर्जाचे प्रमाण आणि भांडवलाचे प्रमाण हे 30 जूनच्या आकडेवारीनुसार सामान्य पातळीवर पोहोचले आहे.
- युको बँकेच्या निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण हे जूनच्या तिमाहीत घसरून हे 4.95 टक्के झाले आहे. जोखीमच्या प्रमाणात आवश्यक असलेल्या भांडवलाचे प्रमाण हे 11.65 टक्के झाले आहे.
- युको बँकेने चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 21.46 कोटींचा नफा मिळविला आहे.
दरम्यान, आरबीआयने पीसीएची कारवाई केल्यानंतर संबंधित बँकेला कर्ज देण्यावर निर्बंध लागू होतात. तसेच बँकेच्या कारभारावर आरबीआयकडून जवळून देखरेख ठेवण्यात येते. बँकेच्या ठेवीदारांचे आणि ग्राहकांचे हितसंरक्षण करण्यासाठी आरबीआयकडून बँकांवर पीसीएची कारवाई करण्यात येते.