ETV Bharat / business

लॉकडाऊनमध्ये दिलासा; 'या' चार शहरामध्ये सुरू होणार उबेरची प्रवास सेवा - उबेर

उबेर ऑपरेशन प्रमुख प्रभजीत सिंग म्हणाले, रुग्णालयासारख्या आवश्यक सेवा पुरविणाऱ्या ठिकाणी नागरिकांना पोहोचण्यासाठी उबेरने सेवा सुरू केली आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेची परवानगी घेण्यात आली आहे.

उबेर
उबेर
author img

By

Published : Apr 15, 2020, 10:18 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन ३ मे रोजीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत वाहनांची सोय नसल्याने अनेक नागरिकांना रुग्णालय आणि मेडिकलपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. ही अडचण लक्षात घेवून 'उबेर इसेन्शियल'सेवा बंगळुरू, नाशिक, गुरुग्राम आणि हैदराबादमध्ये सुरू करण्यात आली आहे.

उबेर ऑपरेशन प्रमुख प्रभजीत सिंग म्हणाले, रुग्णालयासारख्या आवश्यक सेवा पुरविणाऱ्या ठिकाणी नागरिकांना पोहोचण्यासाठी उबेरने सेवा सुरू केली आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेची परवानगी घेण्यात आली आहे. तसेच विविध शहरांच्या स्थानिक यंत्रणेशी चर्चा करण्यात येत आहे. त्यांच्या परवानगीनंतर गरज लक्षात घेवून काही शहरात सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावी लागणार आहेत.

हेही वाचा-कोरोना विषाणू आणि अर्थव्यवस्था : सरकार आणि आपल्यापुढील आव्हाने

वाहनचालकांना सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर देण्यात येणार आहे. त्यांना संचारबंदीच्या काळात देण्यात येणारे पास देण्यात आल्याचे उबेरने म्हटले आहे.

हेही वाचा-देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका; २०२० मध्ये १.९ टक्के विकासदर - आयएमएफचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.