ETV Bharat / business

विमानप्रवासावर पुन्हा संकट; स्पाइसजेटमधील दोन प्रवाशांना कोरोनाची लागण - SoPs for Airlines

गुवाहाटी येथील विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन प्रवाशांना कोरोना झाल्याचा अहवाल 27 मे रोजी आला आहे. या प्रवाशांना व विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले

प्रतिकात्मक - कोरोना चाचणी
प्रतिकात्मक - कोरोना चाचणी
author img

By

Published : May 28, 2020, 1:11 PM IST

नवी दिल्ली - स्पाइसजेटच्या विमानातील दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे प्रवासी स्पाइसजेटच्या विमानाने अहमदाबादवरून दिल्लीमार्गे गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटी येथील विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन प्रवाशांना कोरोना झाल्याचा अहवाल 27 मे रोजी आला. या प्रवाशांना व विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा-कोरोना महामारीचा तडाखा; बोईंगमधील १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

स्पाइसजेट हे सरकारी यंत्रणेशी समन्वय ठेवून काम करत आहे. विमानातील प्रवाशांना योग्य त्या सूचना देण्यात येत असल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे सर्व प्रक्रियेचे आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत असल्याचे स्पाइसजेटने म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाची चाचणी केवळ २०० रुपयात; सीएसआयआरचा रिलायन्सबरोबर करार

अशी घेण्यात येत आहे विमान प्रवाशांची काळजी-

  • सर्व प्रवाशांना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनिटायझर देण्यात येत आहे.
  • विमानातील कर्मचाऱ्यांना पीपीई देण्यात आला आहे.
  • सर्व साधनांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
  • विमानतळावर सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

देशांतर्गत विमान वाहतूक सेवा २५ मे रोजीपासून सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत इंडिगो आणि अलाईन्स एअर फ्लाईट्सच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.