ETV Bharat / business

कोरोनाशी लढा: टीव्हीएस कंपनी सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देणार मोफत लस

author img

By

Published : Mar 6, 2021, 3:04 PM IST

Updated : Mar 6, 2021, 4:26 PM IST

टीव्हीएस कर्मचारी व कुटुंबांचे लसीकरण हे सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे होणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ३५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

TVS Motor Company
टीव्हीस मोटर कंपनी

बंगळुरू- कोरोनाविरोधातील लस कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. दुचाकी आणि तीनचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीव्हीएस कर्मचारी व कुटुंबांचे लसीकरण हे सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे होणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ३५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-तापसी पन्नूसह अनुराग कश्यप यांच्या घरावर २०१३ मध्येही आयटीने मारले होते छापे

टीव्हीएस मोटर कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष (एचआर) आर. आनंदकृष्णन म्हणाले की, कंपनी कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामध्ये आपत्कालीन मदत, कॉलवर डॉक्टर उपलब्ध करून देणे, कोरोनाबाबत जनजागृती आणि मानसिक आरोग्य कार्यक्रम यांचा समावेश आहे.

हेही वाचा-राज्याचा जीडीपी यंदा 5.7 टक्के राहणार; आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

लसीकरणाच्या मोहिमेत आम्ही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्राधान्यक्रम निश्चित करणार आहोत. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात लस ही ६० वर्षांहून अधिक वय असलेले कर्मचारी आणि ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या आजारी व्यक्तींना देण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोनाविरोधातील लशीची किंमत जास्तीत जास्त २५० रुपये निश्चित केली आहे. रिलायन्स कंपनीनेही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोरोनाविरोधातील मोफत लस देण्याचे नुकतेच जाहीर केले आहे.

Last Updated : Mar 6, 2021, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.