मुंबई - टोयोटा किर्लोस्करच्या वाहनांच्या विक्रीत धनत्रयोदशीला गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीत आणखी वाढ होईल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे टोयोटा किर्लोस्कर कंपनीने म्हटले आहे. धनत्रयोदशी देशात दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करण्यात येत आहे. या दोन्ही दिवशी वाहनांच्या विक्रीत १२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीचे उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी म्हटले आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीत वाढ होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. धनत्रयोदशी हा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने, चांदी आणि इतर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. गेल्या काही महिन्यांत वाहनांच्या विक्रीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सोनी यांनी सांगितले. सणामुळे वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचेही सोनी यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये झाली होती वाहनांच्या विक्रीत घसरण-
टोयोटा किर्लोस्करच्या वाहनांच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये २० टक्क्यांची घसरण झाली आहे. टोयोटाच्या ८ हजार ११६ वाहनांची सप्टेंबरमध्ये विक्री झाली आहे.