ETV Bharat / business

ई-कॉमर्स क्षेत्रात टाटा ग्रुपचे महत्त्वाचे पाऊल! बिगबास्केटमध्ये घेतला मोठा हिस्सा - BigBasket

बिगबास्केट या ई-ग्रोसरी वेबसाईटमधून ग्राहकांना ठराविक दिवशी व वेळेत ग्रोसरी घरपोहोच दिले जाते. शेतापासून जेवणातील चमच्यापर्यंत (फार्म टू फोर्क) बिगबास्केटची पुरवठा साखळी आहे.

बिगबास्केट
बिगबास्केट
author img

By

Published : May 28, 2021, 5:03 PM IST

मुंबई - टाटा सन्सची सबसिडरी कंपनी टाटा डिजीटलने सुपरमार्केट ग्रोसरी बिगबास्केटमध्ये मोठा हिस्सा घेतला आहे. टाटा डिजीटलच्या माहितीनुसार ई-ग्रोसरीमध्ये वेगवान वृद्धीदर आहे. भारतामध्ये उपभोक्त्यांची मागणी आणि डिजीटलचा वापर वाढला आहे.

सध्या महामारीमुळे सुरक्षित आणि घरपोहोच किराणा माल (ग्रोसरी) मिळविण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत. बिगबास्केट ही ग्रोसरीमधील सर्वातम मोठी कंपनी आहे. वैयक्तीक उपभोक्त्यामध्ये ग्रोसरीचा देशात सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे बिग बास्केट ही मोठ्या प्रमाणात डिजीटल ग्राहक व्यवस्था करण्यासाठी योग्य कंपनी असल्याचे टाटा डिजीटलचे सीईओ प्रतिक पाल यांनी सांगितले.

हेही वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील निर्बंधात ३० जूनपर्यंत वाढ

टाटा ग्रुपकडून डिजीटल ग्राहक व्यवस्थेची बांधणी

बिगबास्केट या ई-ग्रोसरी वेबसाईटमधून ग्राहकांना ठराविक दिवशी व वेळेत ग्रोसरी घरपोहोच दिले जाते. शेतापासून जेवणातील चमच्यापर्यंत (फार्म टू फोर्क) बिगबास्केटची पुरवठा साखळी आहे. त्यामध्ये १२ हजारांहून अधिक शेतकरी आणि देशभरात अनेक संकलन केंद्रे आहेत. सध्या, टाटा ग्रुपकडून डिजीटल ग्राहक व्यवस्थेची बांधणी करण्यात येत आहे. त्यामधून ग्राहकांच्या विविध गरजेप्रमाणे विविध वर्गवारीत पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हेही वाचा-पोलिसांकडून धमकाविणारी रणनीतीचा दावा तथ्यहीन; केंद्राचे ट्विटरला प्रत्युत्तर

बिगबास्केटचा हिस्सा घेणे ही आकर्षक संधी

सध्या बिगबास्केटचा हिस्सा घेणे ही डिजीटल इकोसिस्टिम तयार करण्याकरिता टाटा ग्रुपसाठी आकर्षक संधी आहे. बिगबास्केटची बंगळुरूमध्ये २०११ मध्ये स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीने २५ शहरामध्ये बिगबास्केटचा विस्तार केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.