चेन्नई- कोरोनाच्या संकटात सुंदरम फास्टनर्सने तामिळनाडू मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विविध प्रकारे कोरोनाच्या लढ्यात मदत केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सुंदरम फास्टनर्सने टाळेबंदीत कर्मचाऱ्यांकरिता घरातून काम करण्याची संधी दिली आहे. कंपनीमधील बैठका या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून करण्यात येत आहेत. कारखान्यातील स्थलांतरित मजुरांसाठी अन्न, कीट आणि मास्क देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच कंपनीमधील सुरक्षा आणि स्वच्छता कर्मचाऱयांवर देखरेख ठेवली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-टीव्हीएस मोटार कंपनीकडून कर्नाटकला ३ हजार पीपीईसह १० हजार मास्कची मदत