चेन्नई - कोरोनाच्या संकटकाळात कॉर्पोरेट कंपन्या सरकारला मदत करत आहेत. बिगर बँकिंग कंपनी सुंदर फायनान्स आणि टीव्हीस ग्रुपमधील कंपन्यांकडून तामिळनाडू सरकारला ८ कोटी रुपयांची मदत केली आहे. टीव्हीएस ग्रुपमध्ये ब्रेक्स इंडिया, व्हील्स इन्शुरन्स, सुंदरम होम फायनान्स आणि रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स या कंपनीचा समावेश आहे.
टीव्हीएस ग्रुपने तामिळनाडू मुख्यमंत्री सहाय्यता निदीली २.५० कोटी आणि तामिळनाडू आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेले २.५० कोटी रुपयांची मदत केली आहे. तीन कोटी रुपये ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, ऑक्सिजन फ्लो मीटरच्या खरेदीसाठी मदत केली आहे. व्हील्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीवत्स राम यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना ८ कोटी रुपयांचे धनादेश सचिवालयात सुपूर्त केला आहे.
हेही वाचा-होंडा मोटरसायकलकडून पुन्हा उत्पादन सुरू; डीलरला करणार आर्थिक मदत
कंपनी कर्मचाऱ्यांचे करणार मोफत लसीकरण
कोरोनाविरोधातील लस कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. दुचाकी आणि तीनचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्हीएस कर्मचारी व कुटुंबांचे लसीकरण हे सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे होणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ३५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष (एचआर) आर. आनंदकृष्णन म्हणाले की, कंपनी कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामध्ये आपत्कालीन मदत, कॉलवर डॉक्टर उपलब्ध करून देणे, कोरोनाबाबत जनजागृती आणि मानसिक आरोग्य कार्यक्रम यांचा समावेश आहे.
हेही वाचा-कोरोना लशीवरील जीएसटी कपातीचा चेंडू मंत्रिस्तरीय समितीच्या कोर्टात!