ETV Bharat / business

गुगलमध्ये सुंदर पिचाईंचे 'नवे युग'; दुप्पट वेतनासह कोट्यवधी रुपयांचे मिळणार शेअर - सुंदर पिचाई वेतन

सुंदर पिचाईंचे वेतन पुढील वर्षी जानेवारीपासून १० लाख डॉलरहून २० लाख डॉलर करण्यात आल्याची माहिती अल्फाबेट कंपनीने सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनला दिली आहे.

Sundar Pichai
सुंदर पिचाई
author img

By

Published : Dec 21, 2019, 2:03 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई हे अल्फाबेटचेही सीईओ झाल्यानंतर त्यांना घसघशीत रक्कम मिळणार आहे. त्यांचे वेतन दुप्पट होणार आहे. तर कोट्यवधी रुपयांच्या शेअरसह त्यांना सुमारे १ हजार ६९४ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

सुंदर पिचाई यांना २४ कोटी डॉलरचे शेअर बक्षीस म्हणून मिळणार आहेत. यामधील ९ कोटी डॉलर हे अल्फाबेटमधील कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत. सुंदर पिचाईंचे वेतन पुढील वर्षी जानेवारीपासून १० लाख डॉलरहून २० लाख डॉलर करण्यात आल्याची माहिती अल्फाबेट कंपनीने सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनला दिली आहे.

हेही वाचा-'भारतीय उत्पादनांच्या निर्यातीत अडथळे आणणाऱ्या देशांना प्रत्युत्तर देवू'

सुंदर पिचाईंना गुगलबरोबर अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे वेतन वाढविण्यात आल्याचे अल्फाबेटने म्हटले आहे. पिचाई यांना ९ कोटी डॉलरचे शेअर बक्षीस म्हणून गुरुवारी देण्यात आले आहे. याशिवाय पिचाई यांना १२ कोटी डॉलर आणि ३ कोटी डॉलर असे दोनवेळा शेअर बक्षीस म्हणून देण्यात आलेले आहेत. हे शेअर त्यांच्या कामगिरीवर नव्हे तर त्यांनी पुढेही कंपनीसमवेत काम करावे, यासाठी देण्यात आलेले आहेत.

संबंधित बातमी वाचा-सुंदर पिचाईंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा; अल्फाबेटच्या सीईओपदी नियुक्ती

गेल्या महिन्यात गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी अल्फाबेटच्या सीईओपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर मूळ भारतीय वंशाचे पिचाई हे गुगल आणि अल्फाबेट अशा दोन्ही कंपन्यांचे सीईओ झाले आहेत.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.