ETV Bharat / business

स्पाईसजेट ड्रोनद्वारे जीवनावश्यक वस्तूंची करणार डिलिव्हरी - essential supplies by drone

स्पाईसजेटचे व्यस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, की नवसंशोधन आणि तंत्रज्ञान हे नेहमीच स्पाईसजेटच्या मिशनचे मूलभूत तत्व राहिले आहे. आम्ही नेहमीच उत्पादन आणि सेवांमधून नवसंशोधनाला प्रोत्साहन देत आहोत.

स्पाईसएक्सप्रेस
स्पाईसएक्सप्रेस
author img

By

Published : May 29, 2020, 4:25 PM IST

नवी दिल्ली - टाळेबंदीने विमान सेवा वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाला असताना स्पाईसजेटने नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी चालू केली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) स्पाईएक्सप्रेसला ड्रोनच्या चाचण्या घेण्याची परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर स्पाईसएक्सप्रेसकडून ड्रोनद्वारे वैद्यकीय साधने, जीवनावश्यक वस्तू आणि ई-कॉमर्सची उत्पादने ग्राहकांपर्यत पोहोचविली जाणार आहेत.

स्पाईसजेटचे व्यस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, की नवसंशोधन आणि तंत्रज्ञान हे नेहमीच स्पाईसजेटच्या मिशनचे मूलभूत तत्व राहिले आहे. आम्ही नेहमीच उत्पादन आणि सेवांमधून नवसंशोधनाला प्रोत्साहन देत आहोत. देशात जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ड्रोनचे तंत्रज्ञान हे कमी खर्चात उपयोगी पडू शकते. नाशवंत उत्पादने आणि औषधांची देशातील दुर्गम भागात वाहतूक करण्यासाठी उत्साही आणि आशावादी असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-'या' कारणामुळे भारतातून आयात होणाऱ्या डुक्कराच्या मांसावर चीनमध्ये बंदी

स्पाईएक्सप्रेस ही स्पाईसजेटची मालवाहू विमान सेवा आहे. दरम्यान, टाळेबंदीमुळे विमान कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंद ठेवल्याने कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

हेही वाचा-कोरोनाने नोकऱ्यांना 'ग्रहण'; रिनॉल्ट कंपनीकडून १५ हजार कर्मचारी कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.