मुंबई - कोरोनाच्या लढाईत देशाला साथ देण्यासाठी अनेक उद्योग पुढे येत आहेत. सोनालिका ट्रॅक्टर कंपनीने व्हेटिंलेटर विकसित केले आहे. दर महिन्याला ३ हजार व्हेटिंलेटर तयार करण्याची क्षमता असल्याचे सोनालिका कंपनीने म्हटले आहे.
-
(1/3) In response to our Hon'ble PM @narendramodi call for #AatmanirbharBharat, we are proud to present our Advanced Ventilator System. This has undergone accelerated durability tests for over 1 million cycles non- stop. pic.twitter.com/dj9rlYDAlg
— Sonalika Tractors (@Sonalika_India) May 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">(1/3) In response to our Hon'ble PM @narendramodi call for #AatmanirbharBharat, we are proud to present our Advanced Ventilator System. This has undergone accelerated durability tests for over 1 million cycles non- stop. pic.twitter.com/dj9rlYDAlg
— Sonalika Tractors (@Sonalika_India) May 15, 2020(1/3) In response to our Hon'ble PM @narendramodi call for #AatmanirbharBharat, we are proud to present our Advanced Ventilator System. This has undergone accelerated durability tests for over 1 million cycles non- stop. pic.twitter.com/dj9rlYDAlg
— Sonalika Tractors (@Sonalika_India) May 15, 2020
सोनालिकाने तयार केलेले व्हेटिंलेटर हे अतिदक्षता विभागासाठी तयार केले आहेत. त्यामध्ये स्वदेशी बनावटीचे ऑईल फ्री कॉम्प्रेसर बसविण्यात आले आहे. त्यामुळे अतिदक्षता कक्षाच्या बाहेरही हे व्हेटिंलेटर काम करू शकते. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याच्या पार्श्वभूमीवर हे व्हेटिंलेटर अत्यंत उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. देशाच्या अडचणीच्या काळात मेक इन इंडियामध्ये योगदान देता येत असल्याने खूप समाधान वाटत असल्याचे सोनालिका ग्रुपचे चेअरमन अमरित मित्तल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-विमान प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली. तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून स्वदेशी व्हेटिंलेटर तयार केल्याचे मित्तल यांनी सांगितले. हे व्हेटिंलेटर तयार करण्यासाठी अनुभवी डॉक्टरांबरोबर सोनालिकाच्या टीमने काम केले आहे.
हेही वाचा-आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षिततेमधील त्रुटी शोधा; मिळवा १ लाख रुपये!