नवी दिल्ली - पर्यावरणाला हानी पोहचवल्या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने आघाडीच्या चारचाकी वाहन कंपनी फॉक्सवॅगनला ५०० कोटींचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात फॉक्सवॅगन ग्रुपच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत याविषयी हरित लवादाने कोणती कार्यवाही करू नये, असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयाने फॉक्सवॅगन ग्रुपला काहीसा दिलासा मिळाला आहे.
फॉक्सवॅगनने त्यांच्या डिझेल कारमध्ये 'चीट डिव्हाईस'चा वापर केला आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा ठपका ठेवत हरित लवादाने ५०० कोटींचा दंड सुनावला होता. त्याविरुद्ध फॉक्सवॅगन ग्रुपकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली.