ETV Bharat / business

शिल्पा केअरचा डॉ. रेड्डीजबरोबर करार; पहिल्या वर्षी ५ कोटी 'स्पूटनिक व्ही'चे घेणार उत्पादन - स्पूटनिक व्ही उत्पादन

पहिल्या वर्षी शिल्पाकेअरकडून ५ कोटी लशींचे डोस उत्पादन करण्यात येणार आहे. कोरोना लशीच्या निर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान स्पूटनिककडून शिल्पा मेडीकेअरकडे सोपविले जाणार आहे.

स्पूटनिक व्ही
स्पूटनिक व्ही
author img

By

Published : May 17, 2021, 3:01 PM IST

नवी दिल्ली - संपूर्ण देशाला लसीकरणाचे उत्पादन वाढण्याची व डोस मिळण्याची प्रतिक्षा असताना दिलासादायक बातमी आहे. औषध कंपनी शिल्पा मेडिकेअरने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजबरोबर करार केला आहे. या करारामुळे शिल्पा मेडिकेअरला कोरोना लस स्पूटनिक व्ही लशीचे उत्पादन करता येणार आहे.

शिल्पा बायॉलॉजिकल्स प्रा. लि. (एसबीपीएल) कंपनीने डॉ. रेड्डीज लॅबोरटरीबरोबर तीन वर्षाचा निश्चित करार केला आहे. या करारानुसार कंपनी स्पूटनिक व्ही लशीचे उत्पादन कर्नाटकमधील धारवाड येथे असलेल्या उत्पादन प्रकल्पामधून करणार आहे.

हेही वाचा-'स्पूटनिक व्ही' मार्चमध्ये लाँच करण्याचा डॉ. रेड्डीजचा प्रयत्न

शिल्पाकेअर करणार उत्पादन, वितरण आणि मार्केटिंग-

पहिल्या वर्षी शिल्पाकेअरकडून ५ कोटी लशींचे डोस उत्पादन करण्यात येणार आहे. कोरोना लशीच्या निर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान स्पूटनिककडून शिल्पा मेडीकेअरकडे सोपविले जाणार आहे. करारानुसार एसबीपीएलही कोरोना लशीच्या उत्पादन, वितरण आणि मार्केटिंगसाठी जबाबदार असणार आहे. स्पूटनिक लाईटचे उत्पादन घेण्याच्या पर्यायावरही शिल्पा मेडीकेअर विचार करत आहे.

हेही वाचा-देशाला मिळणारी तिसरी कोरोना लस; स्पूटनिक देशातील बाजारपेठेत पुढील आठवड्यात होणार दाखल

लशीची किंमत ९९५.४० रुपये

रेड्डीज लॅबोरटरीने शुक्रवारी आयात केलेल्या स्पूटनिक व्ही लशीचे सॉफ्ट लाँचिंग केले आहे. या लशीचा पहिला डोस डॉ. रेड्डीजचे वरिष्ठ कार्यकारी दीपक सप्रा यांना देण्यात आला. या लशीच्या डोसची किंमत ९४८ रुपये आहे. तर ५ टक्के जीएसटी लागू करून लशीची किंमत ९९५.४० रुपये असणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हसमेंट फंडने (आयरडीआयएफ) विकसित केलेली स्पूटनिक लस भारतात १ मे रोजी दाखल झाली होती.

हेही वाचा-कोरोनावरील 'स्पूटनिक व्ही' लस फायझरसह मॉर्डनहून स्वस्त; रशियाचा दावा

स्पूटनिक व्ही लशीबाबत हे आहेत महत्त्वाचे मुद्दे

  • डॉ. रेड्डीजने सप्टेंबर २०२० मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे.
  • स्पूटनकि व्ही ही लस विकसित करणाऱ्या गॅमेलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमिलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजीला भारतात 125 दशलक्ष लशीचे डोस देण्याची परवानगी मिळालेली आहे.
  • यापूर्वीच आरडीआयएफचे सीईओ किरील दमित्रिएव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत भारतामध्ये 50 दशलक्ष डोसचे उन्हाळ्यात उत्पादन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आरडीआयएफने भारतामधील पाच औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत.
  • स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.