नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान निधीसाठी १०० कोटींची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
देशात सर्वाधिक कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेत २ लाख ५६ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे वेतन पीएम केअर्स फंडला देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयत्नांमधून स्टेट बँकेचे कर्मचारी १०० कोटींची मदत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
हेही वाचा-'मरकज'ला गेलेल्या तामिळनाडूतील 50 जणांना कोरोनाची बाधा
स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले, आमचे कर्मचारी स्वेच्छने पुढे आले आहेत. ही स्टेट बँक ऑफ इंडियासाठी अभिमानाची बाब आहे. महामारीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी एसबीआय ही सरकारला सतत मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-''पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करू नये"