नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडियाने आधारकार्डवर देण्यात येणाऱ्या डिजिटल सेवेची पुन्हा सुरुवात केली आहे. ग्राहकांना केवळ आधारकार्डवची माहिती देऊन योनो डिजिटल सेवेचा लाभ घेता येणार आहे.
एसबीआयच्या योनो ॲपमधून ग्राहकांना बँकिंग आणि लाइफस्टाइलच्या विविध सेवा देण्यात येतात.
'इन्स्टा बँक बचत खाते'या ऑफरमधून ग्राहकांना कागदपत्रविरहित डिजिटल खाते काढता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांचा केवळ पॅन व आधार कार्डचा क्रमांक लागणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले, की या डिजिटल खात्यांमध्ये पेपरलेस बँकिंगचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना बँकेत येण्याची गरज नाही. हे खाते काढल्यानंतर रुपी एटीएम डेबिट कार्ड देण्यात येणार आहे.
खाते काढण्यासाठी ग्राहकांना योनो ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.