नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा ४१ टक्क्यांनी वाढला आहे. स्टेट बँकेने तिसऱ्या तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत ६,७९७.२५ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४,८२३.२९ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे उत्पन्न वाढून ९५,३८४.२८ कोटी रुपये झाले आहे. तर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ऑक्टोबर-डिसेंबरमधील तिमाहीत स्टेट बँकेने ८४,३९०.१४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. स्टेट बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) कमी झाले आहे.
हेही वाचा - जाणून घ्या, आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
बँकेने तिसऱ्या तिमाहीत मिळविलेला नफा हा आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या बुडित कर्जाचे प्रमाण ८,१९३.०६ कोटी रुपये झाले. तर मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत १३,९७०.८२ कोटी रुपये एवढे बुडित कर्जाचे प्रमाण होते.
हेही वाचा - सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्यासाठी टीमचे कठोर प्रयत्न