गुरुग्राम- सणाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध मोबाईल कंपन्या आकर्षक मॉडेल बाजारात आणत आहेत. सॅमसंगनेही गॅलॅक्सीच्या 'ए' श्रेणीतील ए७०एस हा स्मार्टफोन भारतात लाँच केला. या स्मार्टफोनची (६ जीबी+ १२८ जीबी ) किंमत २८,९९९ पासून पुढे आहे.
अत्यंत स्थिर अशा पद्धतीने (सुपर स्टिडी मोड) अॅक्शन व्हिडिओ काढता येतात. तर रात्रीच्या वेळी प्रकाशातही छायाचित्रे घेणे शक्य असल्याचे सॅमसंग इंडियाचे (मोबाईल बिझनेस) मुख्य विपणन अधिकारी रणजीव्जीत सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा-नेतृत्वाने उत्कृष्ट होण्याकरिता प्रेरित करावे; खचवू नये - टाटाचे वरिष्ठ अधिकारी
- सॅमसंगचा गॅलक्सी ए७०एस या मॉडेलला ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन आजापसून ऑनलाईन पोर्टल आणि दुकानांमध्ये उपल्बध होणार आहे.
- गॅलेक्सी ए७०एस(८ जीबी+12८जीबी ) ची किंमत ३०,९९९ रुपये असणार आहे.
- स्मार्टफोनला ६४ मेगापिक्सेलबरोबर तीन कॅमेरे आहेत. पुढील कॅमेरा हा ३२ मेगापिक्सेलचा आहे.
- स्मार्टफोनला २५ वॅटच्या उर्जेने लवकर चार्ज होणारी ४५०० एमएएचची बॅटरी आहे.
- कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेची सहाय्य असलेले गेम बुस्टर आणि 'सॅमसंग पे'ची सुविधा आहे.
- नव्या पिढीसाठी व्हिडिओ लाईव्ह करण्यासाठी एलाईव्ह कॅमेराचे खास सुविधा आहे. गॅलक्सी ए७०एस ला ६.७ इंचचा (एफएचडी + इनफिनिटी यू) डिस्पले आहे. तर स्मार्टफोन ओक्टा-कोअर क्वालकोम्न स्नॅपड्रॅग्न ६७५ या प्रोसेसरने जलद काम करणार आहे.