ETV Bharat / business

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष भारतात; पंतप्रधानांसह मुकेश अंबानींची भेट घेण्याची शक्यता - सॅमसंग गुंतवणूक

सणानिमित्त ग्राहकोपयोगी उत्पादनांची बाजारपेठ तेजीत आहे. या पार्श्वभूमीवर सॅमसंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भारत भेट महत्त्वपूर्ण आहे. सॅमसंग इंडियाने २७ ऑक्टोबरला दिवाळीपूर्वी २० लाख स्मार्टफोन विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

संग्रहित - सॅमसंग
author img

By

Published : Oct 7, 2019, 7:44 PM IST

मुंबई - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष ली जे योंग हे भारतात आले आहेत. या भेटीदरम्यान सॅमसंग कंपनीकडून देशात आणखी गुंतवणूक होण्याची शक्यता असल्याचे उद्योगातील सूत्राने सांगितले. योंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची भेट घेतील, अशी शक्यता एका वृत्तसंस्थेने व्यक्त केली आहे.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष ली हे रविवारी भारतात आले आहेत. सॅमसंगकडून रिलायन्स जिओ ४ जी नेटवर्कसाठी लागणाऱ्या उपकरणांचा पुरवठा करण्यात येतो. जीओकडून देशात ५ जी नेटवर्क प्रस्थापित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत दोन बलाढ्य उद्योगपतीमध्ये चर्चा केली जाईल, अशी शक्यता उद्योगातील सूत्राने व्यक्त केली. तसेच ली हे पंतप्रधान मोदींची भेट घेतील, असेही सूत्राने सांगितले.

हेही वाचा-रोजगाराबाबत परिस्थिती अधिक वाईट झाल्याचे ५२ टक्के जनतेचे मत : आरबीआय सर्व्हे

या कारणांनी सॅमसंग इंडिया देशात वाढवू शकते गुंतवणूक

  • चीनमधील मनुष्यबळाचे दर वाढत असल्याने सॅमसंगने नुकताच एक मोठा कारखाना बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. गतवर्षी सॅमसंगने चीनमधील स्मार्टफोनचा कारखाना बंद केला होता.
  • गतवर्षी सॅमसंग इंडियाने जगातील सर्वात मोठा मोबाईलच्या निर्मितीचा कारखाना उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये सुरू केला. चीननंतर सॅमसंग भारतात सर्वात जास्त मोबाईलचे उत्पादन करते.
  • भारतामध्ये ४५० दशलक्ष स्मार्टफोनचे वापरकर्ते आहेत. तर २०२२ पर्यंत देशातील स्मार्टफोनचे वापरकर्ते हे ८५९ दशलक्ष होतील असे असोचॅम-पीडब्ल्यसीच्या संयुक्त अभ्यासात म्हटले आहे.
  • सणानिमित्त ग्राहकोपयोगी उत्पादनांची बाजारपेठ तेजीत आहे. या पार्श्वभूमीवर सॅमसंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भारत भेट महत्त्वपूर्ण आहे. सॅमसंग इंडियाने २७ ऑक्टोबरला दिवाळीपूर्वी २० लाख स्मार्टफोन विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यातून कंपनीला ३ हजार कोटींची उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा-स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची देशाला मिळाली पहिली यादी, पण...

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.